काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघ उपविजेता
चिपळूण (प्रतिनिधी) : राधाकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा दि. ८ ते १० मे या कालावधीत कै.बाबुराव दादाजीराव कदम क्रीडा नगरीत राधाकृष्ण मंदिरा समोर संपन्न झाली. सदर स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात आल्या. एकूण २० संघानी सदर स्पर्धेत भाग घेतला. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अजित आबाजीराव कदम संचालक सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई, टेरवच्या उपसरपंच सौ. रिया राकेश म्हालीम व वाडीतील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते ८ मे रोजी करण्यात आले.
स्पर्धेस विजेत्या संघास रोख पारितोषिके व आकर्षक चषक भेट देण्यात आले. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या विजेत्या संघास कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणाचा अजित वसंतराव कदम यांसकडून रुपये १० हजार रूपये व चषक, काळेश्री कान्हे, मोडकवाडी या उपविजयी संघास कै. सौरभ सुहासराव कदम यांच्या स्मरणार्थ सुहास (नंदू) दत्तात्रयराव कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांसकडून ७५०० रूपये व चषक, केदारनाथ, आडरे व केदार वाघजाई, कोळकेवाडी या दोन्ही उपांत्य विजय संघास प्रत्येकी ५ हजार रूपये व चषक कै. रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री अशोक रघुनाथराव कदम व कै. महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ निलेश महादेवराव कदम यांसकडून देण्यात आले. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या संघाचे राकेश मोडक यांस उत्कृष्ट चढाई पटू म्हणून कै. अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ प्रशांत अनंतराव मोरे आणि बंधू, कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे सोहम कदम यांस उत्कृष्ट पकडी करिता कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ स्वप्नील मानसिंगराव कदम, तसेच कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे संकेत घडशी यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कै. दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री विनय दीपकराव कदम, तर कुलस्वामिनी धामणवणे (उंडरेवाडी) या संघास शिस्तबद्ध संघास कै. राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडूस कूलरही भेट देण्यात आला.
सदर बक्षिचांचे वितरण दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, अजितराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार, गोपीचंदराव, अनिलराव, संभाजीराव, अनंत साळवी, अशोकराव, भाऊराव, विश्वासराव, अशोकराव या मान्यवरांच्या हस्ते दि. १० मे रोजी करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांसाठी २५ सन्मानचिन्हे कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री मानसिंगराव बाबुराव कदम यांनी प्रायोजित केली. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व अबाल वृद्धांनी अपार मेहनत घेतली. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहाय्य करून संस्थेस उपकृत केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिरीष कदम, ओंकार (बाबू) कदम, प्रशांत मोरे, विनय कदम, राजेश कदम व ओम कदम यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचे नियोजन व समालोचन चंद्रकांत मोरे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएनचे जेष्ठ पदाधिकारी यांनी उत्तमरित्या पार पाडले.











