राजा शिवाजी विद्यालय विलवडे चा निकाल 100 टक्के.

ओटवणे (प्रतिनिधी ) ग्रामोन्नती मंडळ मुंबई संचलित राजा शिवाजी विद्यालय विलवडे या प्रशालेचा शालांत परीक्षेचा निकाल 100 टक्के एवढा लागला असून या प्रशालेतून प्रविष्ठ 38 पैकी सर्वच्या सर्व विधार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेतून संचिता किशोर गवस 95.20 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवीला तर, ओम विजय परब 94 टक्के मिळवत द्वितीय,श्रेयस रावजी दळवी 88.60 टक्क्यासह तृतीय तर, सिद्धाई अजित दळवी चथुर्थ क्रमांक तर सिद्धार्थ निलेश परब 88 टक्के गुणांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.या सर्व विध्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी दळवी, मुख्याध्यापक श्री. बुद्ध भूषण हेवाळकर, शिक्षक वृंद मुकुंद कांबळे, वनसिंग पाडवी,अमित पालव,रुपाली बांदेकर सह शालेय कर्मचारी यांच्याकडून तसेच ग्रामस्थानकडून अभिनंदन करण्यात आले.