श्री. रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे चा दहावीचा निकाल 100 टक्के.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथील श्री. रवळनाथ विद्यामंदिर हायस्कूल चा दहावी 2025 चा निकाल 100 टक्के एवढा लागला असून या शाळेतून 35 मुले परीक्षेस बसली होती सर्वच्या सर्व मुलांनी उत्तीर्ण होत यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. या विधाथ्यांमध्ये तन्वी ज्ञानेश्वर गावकर हिने 97.80 टक्के गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळवीला तर, रिया संतोष सावंत व साक्षी सखाराम गावकर यांनी 96 टक्के मिळवत संयुक्त रित्या द्वितीय क्रमांक मिळवत उत्तीर्ण झालीत तर तन्वी चंद्रकांत गावकर हिने 92.80:टक्के मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला.यशस्वी विध्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई,शिक्षवृंद एन. व्ही. राऊळ, इ. डी. धोंगडे, एस. एस. गवस, पी. एम. कांबळे, संस्थाध्यक्ष वामन कवीटकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.