रुण येथील अरविंद कृष्णा चंदुरकर यांचे सामाजिक दातृत्व
संतोष कोत्रे l ला़जा -: आज-काल समाजात माणुसकी हरपल्याची किंवा सामाजिक संवेदनाच नष्ट झाल्याचे
अनेक घटनातून दिसून येते. मात्र याला छेद दिला आहे तो लांजा तालुक्यातील रुण गावातील अरविंद कृष्णा चंदुरकर यांनी. सामाजिक जाणीव जागृती आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपली आई कै.सौ. राधिका कृष्णा चंदुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वखर्चाने आठ लाख रुपये खर्च करून भव्य दिव्य अशी स्मशानशेड उभारली आहे. तीचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला.
गावागावात , वाडीवस्त्यांवर शासनाच्या माध्यमातून पाखाड्या, स्मशानशेड, पिकपशेड, रस्ता यास. अन्य विकास कामे ही होतच असतात. मात्र आजही समाजात सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून काम करणारी काही माणसे आहेत. जी निस्वार्थी भावनेने आणि आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काही देणे लागतो अशा भावनेने काम करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे अरविंद चंदुरकर आणि त्यांचे कुटुंबीय होय. अरविंद चंदूरकर आणि त्यांचे बंधू दीपक चंदूरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे नेहमीच गावच्या सर्व उपक्रमात योगदान असते. त्याच भावनेतून त्यांनी जवळपास ८ लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशी स्मशानशेड उभारली आहे. लांजा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात स्मशानशेडची अशाप्रकारे सुंदर व भव्य
अशी वास्तू नसेल.
या स्मशानशेड इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक १२ मे रोजी कृष्णा चंदूरकर यांच्या शुभहस्ते व अरविंद चंदूरकर, दीपक चंदुरकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांचे उपस्थितीत दिमाखात पार पडला. यावेळी गावचे गावप्रमुख दत्ताराम सरवंदे तसेच गावचे सर्व गावकर सर्व वाडीप्रमुख, रूण ग्रामविकास मंडळ अध्यक्ष, रूण ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्यानंतर ग्रामविकास मंडळ आणि ग्रामपंचायत रूण यांचे वतीने रुग्ण ग्रामपंचायतीच्या सभागृहात चंदूरकर कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्यांचे दातृत्वबद्दल त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि विठ्ठल रखुमाई ची मूर्ती भेट म्हणून देवून यथोचित सन्मान करण्यात आला. तर ही वास्तू उभारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महेश जाधव तसेच उपस्थित सर्वांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संपूर्ण रुण गावच्या वतीने चंदुरकर कुटूंबियांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी अरविंद चंदुरकर यांनी आपल्याला गावासाठी खूप काही करण्याची इच्छा व्यक्त केली.यावेळी त्यांचे आभार मानताना गावचे सरपंच सुहास साखरकर यांनी अरविंद चंदुरकर व कुटुंबिय यांच्या या दातृत्वाचा गौरव करताना त्यांना श्री.अचलेश्वर आई जाकादेवी उदंड आणि दीर्घायुष्य देवो व त्यांच्या उद्योगात त्यांना उदंड यश लाभो अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.










