राजापूर l प्रतिनिधी : राजापूर तालुका चिरेखाण चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष पन्हळे येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ व चिरे व्यावसियक संतोष परर्शुराम उर्फ बाबू सरफरे (६०) यांचे शनिवारी मध्यरात्री ह्दविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील पन्हळे गावचे रहिवाशी असलेले सरफरे हे सगळयांना बाबू सरफरे या नावाने परिचित होते. पन्हळे, हातिवले गवासहत या पंचक्रोशी परिरसरात विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. चिरेखाण व्यवसाच्या माध्यमातुन त्यांचा राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठा संपर्क होता. गेली आठ वर्षे ते राजापूर तालुका चिरेखान चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम पहात होते. या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी चिरेखाण व्यावसायिकांच्या अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यात महत्वाची भूमिका बजावली. एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व म्हणुन त्यांचा परिचय होता.
शनिवारी मध्यरात्री १ वाजता अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले, मात्र ह्दय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चिरेखाण व्यावसायिकांसह अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहीत मुलगी, जावई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सायंकाळी पन्हळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.












