नैसर्गिक आपत्ती काळात प्रशासनाने अधिक सजग व सतर्क रहावे-आ. किरण सामंत

जनतेला कोणताही त्रास व गैरसोय होणार नाही याची दक्षता

राजापुरातील पुररेषेचा अवाहल नागरिकांना विश्वासात घेऊन तयार करा

राजापूर | प्रतिनिधी : नैसर्गिक आपत्तीचा काळ लक्षात घेता प्रशासनाने या काळात अधिक सजग व सतर्क राहिले पाहिजे, जनतेला कोणताही त्रास व गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. राजापूर शहरातील पुररेषाबाबत पाठविण्यात येणारा अहवाल हा नागरीकांना विश्वासात घेऊना पाठविण्यात यावा. शहरातील नाले, गटारे पावसाळयापुर्वी साफ करण्यात यावेत अशा सुचना आमदार किरण सामंत यांनी राजापूर नगर परीषद प्रशासनाला दिल्या आहेत. पावसाळयाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी राजापुर तहसीलदार कार्यालयात आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नैसर्गिक आपत्ती आढाव बैठक पार पडली. या बैठकीत आ. सामंत यांनी प्रशासनाने केलेल्या कामचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आ. सामंत यांनी चांगलेच धारेवर धरले. पावसाळयात नैसर्गिक आपत्ती काळात तालुक्यातील जनतेला त्रास झालेला आपण खपवून घेणार जाणार नाही अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी विभागवार आमदार किरण सामंत यांनी आढावा घेतला. राजापूर शहर पूररेषेबाबत नागरीकांना विश्वासात घेऊन काम करा. पूररेषा संदर्भात सद्या नागरीकांच्या मोठया प्रमाणावर असून पाठवलेला अहवाल नागरीकांना विश्वासात घेऊन पुन्हा तयार करवा असे निर्देश त्यांनी दिले. तर नगर परिषदच्या हद्दीतील गटारे, मोऱ्या साफ करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. नगरपरिषद कडे असलेल्या बोटी अद्यावत करून पूरस्थितीत वापरता येतील याची तयारी करा. तसेच आरोग्य, जलसंधारण, धरणे, दवाखाने, कृषी, जिल्हा परिषद रस्ते, सार्वजनिक बांधकाम रस्ते, पूल, मोऱया, महावितरण, वनविभाग, शाळा, धरणे, पर्यटन स्थळे अश्या विविध विभागाचा आढावा घेतला.
मान्सून हंगामात तालुक्यातील नागरीकांना त्रास होणार नाही किंवा कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेत काम करा असे आदेश सर्व विभागाया अधिकाऱ्यांना आमदार किरण सामंत यांनी दिले. मान्सूनच्या काळात प्रत्येक विभागाचा कर्मचाऱयांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार विकास गंबरे, नायब तहसीलदार दिपाली पंडीत , गटविकास अधिकारी निलेश जगताप, नाटे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, अशफाक हाजू, विलास चाळके, राजू कुरूप तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.