27 माध्यमिक शाळांचा निकाल 100 टक्के
राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला आहे. यामध्ये राजापूर तालुक्याने आपल्या धवल यशाची परंपरा कायम राखली आहे. दहावी परिक्षेचा राजापूर तालुक्याचा एकुण निकाल 97.31 टक्के लागला आहे.
या परिक्षेसाठी राजापूर तालुक्यातील 53 माध्यमिक शाळांमधुन 1826 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. पैकी 1777 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 27 माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
- या परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 418 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, 773 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 478 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 108 विद्यार्थ्यांनी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.