खेड (प्रतिनिधी)खेडचे शिक्षक अनंत करजवकर यांना साने गुरुजी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी सरकार वाचनालय इंगळी आयोजित आणि पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २०२५ नुकतेच कोल्हापुर येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात अनंत करजवकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे, गुजरातचे जेष्ठ हिंदी साहित्यिक गोपाल सहर शर्मा, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. बाळासाहेब लबडे, साहित्यिक अमरनाथ कांबळे, डॉ. श्रीकांत पाटील, चिपळूणचे शाहीर शाहिद खेरटकर, खेडचे कवी भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अनंत करजवकर यांची कोकणची लोकप्रिय कला, “शक्ती तुरा” यातील अनेक गीतांचे लेखन त्यांनी केले आहे.तसेच त्यांनी लेखन केलेली गणपति ची गाणी त्यांनी युट्युब वर प्रसिद्ध केली आहेत. गेली ३५ वर्षे ग्रामीण भागात ते शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. एका सृजनशील शिक्षकातील कवी मन ओळखून या संस्थेने त्यांना साने गुरुजी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.









