सावंतवाडी:गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या ‘गणित प्राविण्य’ परीक्षेत सावंतवाडी येथील शाळा नंबर २ च्या सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. हे सर्व विद्यार्थी पुढील ‘गणित प्रज्ञा’ परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
यामध्ये साहिल शाहू खरात, श्रीकर मंदार शुक्ल, पूर्वांग कुणाल मळगावकर, स्वामिनी अजित कोळी, सानवी चेतन देसाई आणि श्रीशा मिहिर प्रभुदेसाई या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशाने शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे.
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रणजीत सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. पालक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झाले असल्याचे मुख्याध्यापक तेजस बांदिवडेकर यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.











