खेडमध्ये चौथ्या दिवशी पावसाची विश्रांती!

खेड(प्रतिनिधी)गेल्या तीन दिवसा पासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी चौथ्या दिवशी विश्रांती घेतल्याने सर्व सामन्यांना दिलासा मिळाला मात्र हवामान विभागाने पावसाचा पुन्हा अलर्ट दिल्याने नागरिक मात्र चिंतेत आहेत.
मंगळवारी दुपारी ३ वाजल्या पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने सलग तीन दिवस कहर केला होता शुक्रवारी सकाळ पासून पावसाने उघडीप दिल्याने अंशतः विस्कळीत झालेले जन जीवन पूर्वपदावर आले शेतकरी वर्गा सह सर्व सामान्य नागरिक कामात गुंतले मात्र पुन्हा जिल्हा प्रशासना कडून आगामी काही तासात मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांना मधून चिंता पसरली आहे.