आयटीआय लांजा येथे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिवस कार्यक्रमाचे आयोजन 

लांजा (प्रतिनिधी) लांजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) मध्ये दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवराज्याभिषेक दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे.आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन, प्रशासन व रणनीतीमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. म्हणूनच मंत्री ,कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिवस कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे .

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाला शहर परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था लांजा चे प्राचार्य एम.बी. गवई यांनी केले आहे