एलसीबीने ठरवलं आणि चोरटा पकडला

साधारणत: जूनी झालेली मोटरसायकल दिसली की त्या मोटरसायकलला निरखून पहायच, ती मोटरसायकल चावीशिवाय स्टार्ट होऊ शकते का याचा अंदाज घ्यायचा, हे सर्व करण्यापूर्वी अवती-भवतीच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायचा मोटरसायकल मालक जवळपास नाही हे पाहून ती मोटरसायकल आपलीच आहे. अशा अविर्भावात गाडी घेऊन पसार व्हायचे. पेट्रोल संपेपर्यंत गाडी चालवायची असा मोटरसायकल चोरीचा छंद असल्यासारख एक-दोन नव्हे आजवर अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असलेला नितीन अशोक पाळेकर या २८ वर्षीय तरूणाला कणकवली एस.टी.बस स्थानकासमोरील ब्रिजखाली उभ्या करून ठेवण्यात आलेल्या मोटरसायकल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
नितीन पाळेकर या मोटरसायकल चोरट्याने यापूर्वीही गाड्या चोरण्याचे गुन्हे केले आहेत. जुन्या गाड्या सहज स्टार्ट होऊ शकतील त्या गाड्या चोरायची नितीनला आवडच आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकारी आणि पोलिसांना संशय आला. यासाठी सीसीटीव्हीमध्ये मोटरसायकल घेऊन जाणारी व्यक्ती कोण आहे याचा तपास करता सीसीटीव्ही फुटेज पाहून हा मोटरसायकल चोरटा दुसरा-तिसरा कोणीही नसून तो नितीन अशोक पाळेकरच असल्याची खात्री पटली आणि मग तपासकामाला वेग आला. असं एलसीबीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. एलसीबी टिममधील पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलिस हवालदार आशिष गंगावणे, किरण देसाई या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आपला मोर्चा देवगडकडे वळविला. मग या मोटरसायकल चोरीप्रकरणातील संशयित आरोपीचा शोध सुरू झाला. नितीन कुठे काम करतो, सध्या काय करतो, कोणाकडे काम करतो अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नाची माहिती एलसीबीच्या पथकाने घेतली आणि नितीन पाळेकरला ताब्यात घेत देवगड एस.टी. बस स्थानकावर आणले. देवगड एस.टी. बस स्थानकाबाहेरच संशयित आरोपी नितीन पाळेकर यांनी कणकवली एस.टी. बसस्थानकासमोरील ब्रिज खालून चोरलेली मोटरसायकल दाखवली. एलसीबी पथकाने नितीनला पोलिसी हिसका दाखवल्यावर देवगड एस.टी. बसस्थानकाच्या पाठीमागील बाजुस उभी केलेली मोटरसायकल दाखवली. ती मोटरसायकल आपणच चोरून आणून ठेवल्याचे सांगितले. अधिक तपासात नितीन पाळेकर हा संशयित चोरटा मोटरसायकल चोरीप्रकरणात सराईत असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित नितीन पाळेकर यांने पोलिस तपासात कोल्हापूरातही मोटरसायकल चोरल्याचे समोर आले आहे. एक गोष्ट निश्चित आहे. पोलिसांनी ठरवलं तर कोणत्याही गुन्ह्याचा तपास ते करू शकतात. फक्त पोलिसांची इच्छाशक्ती हवी. ओसरगाव तळ्याकाठावर एका महिलेला ठार मारून जाळण्यात आले होते. परंतु स्थानिय गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कोणताही पुरावा नसताना फार कमी वेळात तपास करून आरोपीला जेरबंद केले आहे. एलसीबीच्या चांगल्या कामाचे कौतुक आहेच. परंतु अन्य गुन्ह्यांमधील आरोपी जेरबंद व्हावेत एवढीच अपेक्षा आहे.


सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक म्हणून ठाणे शहर पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असणारे डॉ. मोहन दहिकर यांची सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्गातील सर्वसामान्य जनतेला यापुढच्याकाळात वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तर सर्वसामान्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला चांगली सेवा मिळेल. पोलिस स्टेशनचा कारभार कसा रहातो. सामान्यांना कसं वागवलं जात याचे सामान्यांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. मात्र, पोलिस अधिक्षकांनी कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्यांना चांगली पोलिसी सेवा मिळेल हा विश्वास सिंधुदुर्गवासियांना दिला आहे. पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या सामान्यांना सुखकर काम करण्याच्या कार्यपद्धतीचीच जनतेला अपेक्षा आहे.