शिरवली ग्रामपंचायतमध्ये शेतकऱ्यांची घेतली शेतीशाळा

चिपळूण (वार्ताहर) : शिरवली ग्रामपंचायतमध्ये शेतकऱ्यांसाठी शेती शाळा घेण्यात आली. मार्गताम्हाणे कृषी मंडळ अधिकारी कोळी बी.एस. यांनी नैसर्गिक शेतीकडे कसे वळावे यासंदर्भात माहिती दिली.
शेतीकडे वळताना दरापर्णी अर्क तयार करण्याचे मार्गदर्शन, सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत फळबागा लागवडी याबद्दल मार्गदर्शन केले. शेतकरी ओळखपत्र बाबत माहिती दिली. शेतीशिवाय पर्याय नाही. भविष्यात प्रत्येक जण पुन्हा शेती करण्यासाठी पुढे येईल असेही त्यांनी सांगितले. या शेती शाळेला अनेक शेतकरी उपस्थित होते.