माखजन | वार्ताहर : सध्या होऊ घातलेल्या पनवेल ते कन्याकुमारी रस्त्यावर संगमेश्वर शास्त्रीपुल ते पुढील २,३ किलोमीटर रस्त्याची चालणं झाली आहे.

भर धो धो पावसात डांबरीकरण करण्यात येत आहे.पडत असलेल्या पावसात डांबरीकरण करून शासकीय पैशांची उधळपट्टी सूरु असल्याचे चित्र आहे.पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे .नियोजन शून्य कारभार सुरू असल्याने हे सुरू आहे.भर पावसात डांबरीकरण केलेले कसे टिकणार असा सवाल उपस्थित होत आहे.खर तर एप्रिल नंतर डांबरीकरण थांबवली जातात.पण संगमेश्वरात चक्क धो धो पावसात डांबरीकरणा ची मलमपट्टी करून शासकीय पैशांची उधळण केली जात आहे.पाऊस बरसत असताना डांबरीकरण करणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना कसे सुचते असे विचारले जात आहे
या भर पावसात सुरू असलेल्या डांबरीकरणा ची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.












