घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाची केली ॲड. खलिफे यांनी पाहणी
जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील नाटे येथील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून नवीन केलेल्या कामाची पडझड झाली आहे. याची दखल घेत माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी बुधवारी नाटे येथे किल्ल्याला भेट देत पाहणी केली. याबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर लवकरच आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती ॲड खलिफे यांनी दिली आहे.
घेरा यशवंत गड किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाची पडझड झाली असल्यामुळे या भागातील शिवप्रेमी मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. साखरी नाटे आणि नाटे ग्रामपंचायतींना कुठलाही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. प्रमाणे इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा किल्ल्याचे काम सुरू असताना विश्वासात घेण्यात आलेले नाही अशा तक्रारी आहेत. अशा प्रकारे नवीन काम करताना त्याची पडझड होतेच कशी? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबत आपण राजापूर तहसीलदारांची भेट घेऊन चर्चा करणार असून सदर घटनेची सविस्तर माहिती तहसीलदारांना सांगणार आहेत. त्याचप्रमाणे आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून त्या कामाच्या चौकशी लावून हे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणी प्रसंगी साखरी नाटे सरपंच श्रीमती गुलजार ठाकूर, नाटे सरपंच श्री. बांदकर, यांच्यासह मलिक गडकरी, मजीद सायेकर, देवेंद्र बांदकर, निलेश बांदकर, संतोष चव्हाण, सिद्धेश मराठे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











