रत्नागिरी : जिल्हा परिषद वर्ग ४ कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद हवालदार पदावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्ग चार मधून हवालदार पदावर नेमणूक झालेले प्रकाश आंबेकर (सामान्य प्रशासन विभाग), मनोहर भोसले (वित्त विभाग), दीपक पवार (प्राथमिक शिक्षण विभाग), अनिल भोरे (बांधकाम विभाग), संजय गायकवाड (माध्यमिक शिक्षण विभाग) यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी वर्ग चार संघटनेचे अध्यक्ष विलास पवार, सचिव रवींद्र होतेकर यांच्यासह वर्ग चारचे कर्मचारी उपस्थित होते.









