निवळी अपघातात ३० जण जखमी; एक गंभीर 

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा रुग्णालयाला दिली भेट 

रत्नागिरी : प्रतिनिधी :मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे रविवारी सकाळी 8 वा. सुमारास गॅस टँकरने मिनीबसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मिनीबस चालकाचे नियंत्रण सूटल्यामुळे बस खोल दरीत कोसळून मिनीबसमधील 30 प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये शिक्षकांचा समावेश असून सर्वजण रत्नागिरीत प्रशिक्षणार्साठी येत होते

 

 

त्यातील एक गंभिर जखमी आहे. जखमींवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,गॅस टँकरमधील गॅस लिक होउन आजुबाजुच्या दोन घरांना लाग लागली असून त्यात एक म्हैस होरपळली आहे. त्याठिकाणी अग्निशमन दल आणि ग्रामीण पोलिस दाखल झाले असून परिस्थितीत नियंत्रणात आणण्याचे काम युध्द पातळीवर सूरु आहे.

मालिनी दिपक चव्हाण( 40 रा. धारतळे,रत्नागिरी ) या गंभिर जखमी आहेत. तर संकेत कृष्णकांत जागुष्टे(28), सुलक्षणा पाटील (40), दिलीप डोंगरे(53),स्नेहा मिस्त्री(47),

उषा खुडे (38, रा. खेर्डी चिपळुण),

निता विनायक शिरकर(38, रा. चिपळुण),

मंदार खाडे(53, रा. सावर्डे चिपळुण) उदय खताते(55, रा. चिपळुण), जयश्री गावडे(53 रा. सावर्डे चिपळुण), मनीषा कांबळे( 47, रा. खेर्डी चिपळुण), श्वेता चव्हाण (48,रा. चिपळुण), प्रियंका जाधव(38 वर्षे रा. सावर्डे,चिपळूण), राजेश यादव (47, रा. सावर्डे,चिपळूण),विराज सावंत (रा.47, सावर्डे,चिपळूण), स्मिता पाटील(48), धर्मेंद्र देरूगडे (53), निशीकांत वानरकर(51), रूपाली यादव(50), हर्षाली पाकळे(26), निता बांद्रे(38),विना घागडे(52), प्रशांत आग्रे(34, रा. करबुडे रत्नागिरी),अनंत बारकू गमरे( 65,रा. चिपळुण), अमोल बावकर, (30,रा. राजापुर रत्नागिरी), विदक योगेश म्हादये(29 रा. आगवे मोरेवाडी रत्नागिरी), अमोल मुळ्ये,(29 रा. देवरूख रत्नागिरी),

सदफ वारीफ मुल्ला (पावस, रत्नागिरी),

अक्षय आंबेळकर(32 रा. करेळ), सोनाली हरेश अनंत सावंत(30 21. सैतवडे,रत्नागिरी) अशी अपघातामधील 30 जखमींची नावे आहेेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस टँकर बाहेर काढण्याचे काम सुरु होते. या अपघातामुळे त्या रस्त्यावरील वाहतुक पाली व संगमेश्वर येथून वळवण्यात आली आहे.