14 तासानंतर पूर्ववत झाला महामार्ग 

रत्नागिरी : महामार्ग रात्री एक वाजून वीस मिनिटांनी सुरळीत सुरू झाला आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. ट्रॅव्हल्स बस व टँकरची धडक या भीषण अपघातामुळे सुरू झालेली एलपीजी टँकरच्या गळती थांबवण्यात मध्यरात्री उशिरा यश आले आहे. वाहतूक रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान बंद करण्यात आलेली महामार्गावरील वाहतूक तब्बल 14 तासानंतर सुरू करण्यात यश आले आहे. सोमवारी मध्ये तरी एक वाजून वीस मिनिटांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस प्रशासन एमआयडीसीचे अधिकारी कर्मचारी व जेएसडब्ल्यू अधिकारी कर्मचारी यांना एलपीजी गॅस गळती थांबवण्यात यश आल आहे