चिपळूण (प्रतिनिधी) : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी वटपौर्णिमेनिमित्त वडाची झाडे लावली जातात महिलांनी झाडाच्या फांद्यां न तोडता त्यादिवशी एक तरी झाड लावावे, हा संकल्प जिजाऊ ब्रिगेडने अनेक वर्ष चालू केला आहे. त्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. अशी झाडे लावली जातात. निसर्ग पूजक असलेली आपली भारतीय संस्कृती. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे “. पण आज सिमेंटची जंगले सर्वत्र निर्माण होताना दिसत आहेत. विकासाच्या नावाखाली सगळीकडे होणारी जंगलतोड वृक्षतोड पर्यावरणाला धोका निर्माण करणारी ठरत आहे. निसर्गाचा समतोल सुद्धा बदलत चालला आहे. सजग नागरिक म्हणून आम्ही “जिजाऊ ब्रिगेड संघटनेच्या” माध्यमातून वडाची झाडे लावून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहभागी व्हा. असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाला मालती पवार, निर्मला जाधव, स्मिता खंडारे, प्राजक्ता सरफरे, अनामिका हरधारे, पूजा सुर्वे, दीपा हरधारे उपस्थित होत्या. त्याचबरोबर या कार्यक्रमाला न्यू इंग्लिश स्कूल सतीचे मुख्याध्यापक संजय वरेकर, संतोष हातणकर, मिलिंद यादव यांनी सहकार्य केले.











