राजापूर l प्रतिनिधी. : तालुक्यात शुक्रवारी
मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे या पार्श्वभूमीवर तहसीलदार विकास गंबरे यांनी शनिवारी आपद ग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी त्या त्या भागातील मंडळ अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी, पोलीस पाटील सरपंच आदी उपस्थित होते. यावेळी सर्व आपतग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार गंबरे यांनी केल्या.












