निरुळ येथे विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा रुग्णालयात मृत्यू  

रत्नागिरी l प्रतिनिधी :तालुक्यातील निरुळ येथे विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवार 14 जून रोजी दुपारी 12.15 वा.घडली.

रिया संजय ठिक (34,रा.निरुळ,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिने शुक्रवार 13 जून रोजी अज्ञात कारणातून राहत्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. ही बाब तिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना उपचारांदरम्यान शनिवार 14 मे रोजी दुपारी रियाचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.