मोडकाघर – तवसाळ मार्गावरील पालशेत येथे* *वळणावर अवजड ट्रेलर* *अडकला!वाहतुकीची कोंडी!* 

*सहा तासांच्या अथक* *प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत!* 

पालशेत : (वार्ताहर)

गुहागर तालुक्यातील मोडकाघर – तवसाळ मार्गावरील पालशेत येथील पाटावरची वाडीनजिक एका वळणावर एक अवजड ट्रेलर अडकला.त्यामुळे वाहतूक ठप्प झाली.ही घटना दिनांक २३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वा. च्या सुमारास घडली.

सदर ट्रेलर क्रमांक RJO1G D4991 हैदराबादहून तवसाळला होऊ घातलेल्या पुलाचे स्टील सामान घेऊन निघाला होता.साधारणतः ४० टन स्टील वाहून नेणारा हा ट्रेलर पालशेतच्या अवघड वळणावर फसल्यामुळे रस्ता दोन्ही बाजूंनी बंद झाला.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.या ट्रेलरला क्रेनच्या सहाय्याने मोकळे करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र ट्रेलरमध्ये असलेल्या जवळपास चाळीस टन स्टील मुळे यश येत नव्हते.अखेर आणखी एक क्रेन आणल्यानंतर सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रेलर मोकळा करण्यात यश आले. सायंकाळी साडेपाच वाजता फसलेला हा ट्रेलर रात्री बारा वाजता क्रेन आणि स्थानिकांच्या मदतीने मार्गस्थ झाला.

यावेळी पालशेतचे महसूली गाव पालशेत, निवोशी आणि मारुतीमंदिर पोलिस पाटील,परिसरातील सजग नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले.