प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: भरून आलेले आभाळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह पुणे आणि परिसरात सोमवारी दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. रविवारपासून उकाडा प्रचंड वाढलेला असताना पावसाच्या सरींनी तापमानात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात २९ तारखेपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. बुधवार दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली. यावेळी राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे मोठ्या प्रमाणत गारा पडल्या.
राधानगरी, वाळवा, सरवडे, राशिवडे ठिकपुर्ली सह इतर ठिकाणी बुधवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. परिसरात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
सुमारे दीड तास पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले.
पहिल्याच गारांचा पावसामध्ये चिमुकल्याने भिजण्याचा आनंद घेतला.













