‘माय भारत’ चे सिंधुदुर्ग आणि गोवा समन्वयक कालिदास घाटवळ यांचे सिंधुदुर्ग नगरीत जल्लोषात स्वागत!

सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘माय युवा भारत’ (MY Bharat) सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा (पणजी) येथील DYC समन्वयक श्री. कालिदास घाटवळ यांचे पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग नगरीत नुकतेच उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे जल्लोषात अभिनंदन केले.

या खास प्रसंगी निरवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. जयराम जाधव, पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापिका कुमारी फिजा मकानदार, तसेच नासिर मकानदार, भाविका कदम, फातिमा मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्राध्यापिका पूनम गायकवाड आणि विशाल वालावलकर सर यांनीही आपली उपस्थिती दर्शवली.

आपले स्वागत स्वीकारल्यानंतर श्री. घाटवळ सरांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. सध्याच्या आणि भविष्यातील स्पर्धात्मक युगात युवकांनी आपली कौशल्ये कशी जपून ओळखावीत आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कोणत्या प्रकारचे कार्य करावे, यावर त्यांनी भर दिला.

याप्रसंगी श्री. कालिदास घाटवळ सरांनी मकानदार मॅडम यांच्या पब्लिक रिलेशन फाउंडेशन आणि ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.