शिष्यवृत्ती परीक्षेत नायशी विद्यालयाचे यश

 कु.शुभ्रा आंबवकर गुणवत्ता यादीत

चिपळूण (वार्ताहर) : प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये नायशी, कळंबुशी व वडेरू पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ नायशी संस्थेच्या ह.भ.प श्री.आ.बा सावंत माध्यमिक विद्यालयाची इयत्ता पाचवीतील कु. शुभ्रा मिलिंद आंबवकर या विद्यार्थ्यांनीने जिल्हा गुणवत्ता यादीत ११५ वी. येण्याचा मान मिळवला आहे.
प्रशाला आणि संस्थेतर्फे आज संस्था अध्यक्ष सुमित चव्हाण, उपाध्यक्ष सुरेश आग्रे, सचिव रुपेश गोसावी, संचालक श्रीधर घाग व किशोर कदम, मुख्याध्यापक आनंदा घाटगे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करण्यात आला. गतवर्षी पाचवी शिकणाऱ्या शुभ्रा मिलिंद आंबावकर हिने मंथन परीक्षेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हास्तरावर ३८ वा क्रमांक प्राप्त केला होता. प्रशालातर्फे संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षकांनाही पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तसेच कळंबुशी गावचे सुपुत्र सिद्धेश नंदकुमार चव्हाण यांच्यातर्फे प्रशालेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना पेन वाटप करण्यात आले. तर कृष्णकांत चव्हाण यांनी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेली कु. संतोषी शिवा मंडल हीस कपडे, छत्री, चप्पल व इतर सर्व शैक्षणिक साहित्यांचे वाटप उपस्थित संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.