आमदार श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश उर्फ गोटया सावंत, व सौ संजना सावंत यांचा सामाजिक उपक्रम
शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना केले वाटप
कणकवली (प्रतिनिधी ) कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, व सौ संजना सावंत यांच्यावतीने अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी एकुलता एक मुलगा अपंग असलेल्या वयोवृध्द श्रीम रत्नप्रभा अभिमन्यू सावंत रा . नाटळ यांना उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीन देण्यात आली. तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आज कनेडी बाजारपेठ येथील विभागीय कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सौ.संजना सावंत,माजी अध्यक्षा, जि.प.सिंधुदुर्ग,यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आली .यावेळी, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, सांगवे सरपंच श्री.संजय सावंत, सुरेश ढवळ, नाटळ सरपंच श्री.सुनिल घाडीगांवकर,गांधीनगर सरपंच श्री.मंगेश बोभाटे, दारिस्ते उपसरपंच श्री.संजय सावंत,माजी सरपंच श्री.महेंद्र सावंत, अशोक कांबळे, नितीन गांवकर, अजित तांबे, सौ.मयुरी मुंज, सौ.राजश्री पवार,श्री.राॅबर्ट डिसोजा, दिपक नांदगांकर, राजेश सापळे, आणि नाटळ आणि हरकुळ मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










