रस्ता कामगारांची वाट न पाहता कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी रस्त्यावर पडलेले झाड हटवले

 

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता याची हटके स्टाइल

 

कणकवली l देवगड निपाणी रस्त्यावर हडपिड स्वामी समर्थ मठा समोर पावसामुळे झाडाची पडलेली फांदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी प्रवासा दरम्यान स्वतः रस्त्यावर उतरून बाजूला केली. अशा कामासाठी रस्ता कामगार येतील अशी वाट न पाहता त्यांनी आपणच झाड बाजूला करण्यास सुरवात केली. त्यांच्या सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मदत केली आणि मार्ग मोकळा केला.
कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे रस्त्यांची पावसाळ्या पूर्वीची स्थिती पाहण्यासाठी दौऱ्यावर असताना झाड पडले. रस्ता बंद झाला. त्यात एसटी बस अडकणार असल्याने अजयकुमार सर्वगोड यांनी रस्त्यावर उतरत झाड बाजूला करण्यास सुरुवात केली. यावेळी श्री. बासुतकर, उप विभागीय अभियंता, श्री. नवपुते कनिष्ठ अभियंता यांनी त्यांना मदत केली. त्यांनी बजावलेल्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्याची हटके कामाच्या स्टाइल पुन्हा एकदा चर्चेत आली.