मंडणगड, “हर घर तिरंगा” मोहिमेचा भाग म्हणून पंचायत समिती, मंडणगड येथे रानभाज्या महोत्सव व पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्रीम. वैदेही रानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महोत्सवात रानभाज्यांचे पोषणमूल्य, आरोग्यदायी फायदे तसेच रानभाज्यांपासून बनणाऱ्या पारंपरिक पाककृतींचे प्रदर्शन यावर विशेष भर देण्यात आला. विविध महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रानभाज्यांचे प्रकार, त्यांपासून तयार पाककृती पद्धतींचे प्रदर्शन सादर केले.
आपल्या मनोगतामध्ये श्रीम. वैदेही रानडे मॅडम यांनी ग्रामीण भागातील पारंपरिक अन्नसंपदा जपण्याचे व आरोग्यदायी आहाराचा प्रसार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा हा उपक्रम स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारा ठरेल, असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात आदरणीय श्रीमती वैदेही रानडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानी आंबडवे येथे भेट दिली व पुष्पांजली वाहिली व आंबवडे येथीलच प्राथमिक उपकेंद्रास भेट देवुन पाहणी केली.यानंतर त्यांनी नवीन मंडणगड न्यायालयीन इमारतीची पाहणीही केली.
दुपारच्या सत्रात भिंगळोली ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपण केले.
या प्रसंगी श्री. हर्षल चव्हाण, कार्यकारी अभियंता (चिपळूण), जिल्हा परिषद रत्नागिरी; श्री. सुनील खरात गटविकास अधिकारी, मंडणगड; डॉ. अभिषेक गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी; श्रीम. कल्याणी मुळे, गटशिक्षण अधिकारी; श्री. डी. एन. सकपाळे, शाखा अभियंता; श्रीम. पूजा शिंदे, पशुधन विकास अधिकारी; श्रीम. रूपाली मुळे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीम. श्वेता रेवाळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती दापोली; श्रीम. कल्याणी मुळे, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती मंडणगड; व श्रीम. मानसी पवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांनी काम पाहिले.
पाककला स्पर्धेचे निकाल:
प्रथम क्रमांक: प्रीती दीपक जावडेकर, पालवणी
द्वितीय क्रमांक: निर्वि पवन शेडगे, तुळशी
तृतीय क्रमांक: समीक्षा संदेश लोखंडे, कुडुक खुर्द
कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती मंडणगडच्या वतीने करण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व महिला बचत गट,अंगणवाडी सेविका, स्थानिक नागरिक व पंचायत समितीच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे श्रीम. वैदेही रानडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.












