BREAKING : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर

रत्नागिरी :
जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना हा आदेश लागू राहील.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.