बिळवसच्या श्री देवी सातेरी जलमंदिरचा ‘कलश वर्धापन दिन सोहळा’ ७ मे रोजी संपन्न होणार!

​मसुरे | झुंजार पेडणेकर
मसुरे गावची मूळमाया, आदिदेवता आणि आदिशक्ती श्री देवी सातेरी जलमंदिर, बिळवस या मंदिराचा ‘कलश वर्धापन दिन सोहळा’ ७ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
​सकाळी ८ ते ९ गणेश पूजन व पुरोहितांच्या मंत्रघोषात कलश पूजन
, ​सकाळी ९ ते ११ विविध धार्मिक विधी,
​दुपारी १ ते ३ महाप्रसाद,
​दुपारी ३ ते ५ श्री सत्यनारायणाची महापूजा,
​संध्याकाळी ५ ते ७ महाआरती, प्रार्थना आणि तीर्थप्रसाद,
​संध्याकाळी ७ ते १० स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्री ठीक १०:०० वाजता ‘श्री ओमकार नटेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कालेली-कुडाळ’ यांचा भव्य दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
​उपस्थिती चे आवाहन बिळवस ग्रामस्थ आणि श्री देवी सातेरी देवालय ट्रस्ट, बिळवस यांच्या वतीने करण्यात आले आहे.