मंडणगड | प्रतिनिधी : आषाढी एकादशीचे निमीत्ताने शेनाळे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात अभिषेक महाआरतीसह विविध कार्यक्रमाचे ग्रामस्थांचेवतीने आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या पुजेचा मान स्वराज डेअरी फार्म उद्योजक सौ.व श्री निखिल दळवी या उभयतांना मिळाला. ग्रामस्थानी मोठ्या संख्येने या उपक्रमास हजेरी लावलेली होती. सालाबादप्रमाणे मंदिरातील विठ्ठल रखमाई मंदिरातील देवांच्या मुर्तीवर अभिषेक करुन सर्व देवांची विधीवत पुजा करण्यात आली या नंतर ग्रामस्थांची सामुहीक रित्या म्हटलेल्या आरत्यांमुळे येथील परिसर भक्तीमय बनुन गेला यानंतर उपस्थितांना तीर्थप्रसाद व खिचडीचा अल्पोपहार देण्यात आला दिवसभर विविध कार्यक्रमाचे या निमीत्ताने आयोजन करण्यात आले होते. ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष मधुकर साळवी, ज्येष्ठ सल्लागार अनंत जाधव, सचिव/ सरपंच विश्वनाथ सावंत, सहसचिव अमित सालेकर,सल्लागार रेवाळे, दिलीप बामणे, सुनिल साळवी, हरिभाऊ सालेकर, नितीन जाधव,ह.भ.प. सदानंद बुवा वाडकर, शशिकांत बामणे,यां च्यासह सर्व ग्रामस्थ देवळात दिवसभर सुरु असलेल्या विविध उपक्रमासाठी मेहनत घेतली.
फोटो ओळी- आषाढी एकादशीचे निमीत्ताने सुंदर सजवण्यात आलेल्या मुर्तीची पुजा करताना ग्रामस्थ.