मंडणगड l प्रतिनिधी : किल्ले मंडणगड येथे नवयुवक तरुण मंडळ मंडणगड यांच्यावतीने माघी गणेशोत्सवाचे निमीत्तसाधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जन्मोत्सव, सत्यनारायण महापुजा, किर्तन, भाविकांसाठी खिचडीचा महाप्रसाद या कार्यक्रमांना सालबादप्रमाणे भाविकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या उत्सवानिमित्त किल्यावर यात्रेचे स्वरूप येते, विविध प्रकारच्या दुकानांनी उत्सवात आकर्षण वाढते. मंडणगड तालुक्यातील गावागावातून या उत्सवास भाविकांची हजारोंच्या संखेने उपस्थिती राहतात. यंदा अंडरआर्म क्रीकेट स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला तालुक्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली. किल्ले मंडणगड येथील गणपती नवसाला पावतो असा लौकीक असल्याने माघीला नवस फेडण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. आमदार योगेश कदम यांनी उत्सवास उपस्थित राहून श्रीगणेशाचे दर्शन घेतले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष समिर लेंढे, उपाध्यक्ष राहूल कोकाटे, श्रीकांत लेंढे, सौरभ लेंढे, विजय लेंढे, काशीनाथ बैकर यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली बाळू कामेरीकर, संकेत जाधव, वैभव कोकाटे, दिनेश लेंडे, श्रीपाद कोकाटे, राजू पटेल, जयेश नगरकर, कौस्तुभ भिंगार्डे, पराग लेंढे, बापू पंदीरकर, प्रकाश जाधव, शशी पटेल, दिनेश पटेल, विशाल पटेल यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.











