राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

तज्ज्ञांच्या मदतीने राज्यातील बारव आणि विहिरींच्या पाण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली. या नियोजनामुळे ज्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या काळात पाणी पुरवठा करण्यास स्थानिक पातळीवर मोठी मदत होणार आहे, असे मंत्री ॲड आशिष शेलार म्हणाले. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे प्राथमिक जिल्हानिहाय सर्वेक्षण पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.