लांजा तालुक्यातील साटवली बाजारपेठेतील घटना
लांजा | प्रतिनिधी : विनापरवाना विदेशी मद्याचा साठा विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्यावर लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. तालुक्यातील साटवली बाजारपेठ येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १९२५ रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. २८ जुनं रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती लांजा पोलिसांनी शुक्रवारी ३० जून रोजी लांजा पत्रकारांना दिली.
साटवली बाजारपेठ येथे एक जण विदेशी मद्याची विक्री करत असल्याची माहिती लांजा पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी साटवली बाजारपेठ येथे जाऊन कारवाई केली. यावेळी सचिन शंकर कस्तुर (वय ४७ रा. साटवली बाजारपेठ) हा येथील हॉटेल खंडोबाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या आडोशाला विनापरवाना विदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आला. त्याच्याकडे हायवर्ड फाईन व्हिस्की या विदेशी मद्याच्या १८० मिलि मापाच्या ७ बाटल्या आढळून आल्या. त्यांची किंमत ८०५ रुपये आहे. तसेच डीएसपी ब्लॅक डीलक्स व्हिस्की या विदेशी मद्याच्या १८० मिली मापाच्या आठ काचेच्या बाटल्या, प्रत्येक बाटलीरी ची किंमत १४० रुपये असा एकूण १९२५ रुपयांचा मद्यसाठा आढळून आला.
या घटने प्रकरणी सचिन कस्तुर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे .दिनांक २८ जून रोजी रात्री ९,३० वाजता या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टी. एस. मोरे हे करत आहेत.











