संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मौजे साडवली-कासारवाडी येथे आज सकाळी बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने कार्यवाही करत त्याला सुरक्षित ताब्यात घेतले. सकाळी ९:३० वाजता पोलीस पाटील यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली.
वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, श्री. राजेंद्र धने यांच्या घरामागे एक बिबट्या एकाच ठिकाणी बसलेला आढळला. हा बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे आहे. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम झाल्यामुळे तो अडचणीत सापडला होता.
वैद्यकीय उपचार आणि बचाव कार्य
वन विभागाने बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतल्यानंतर तातडीने त्याची वैद्यकीय तपासणी केली. सहायक आयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चे श्री. युवराज शेटे आणि कोल्हापूर वन विभागाचे वन्यजीव पशुवैद्यक श्री. संतोष वाळवेकर यांनी बिबट्यावर उपचार केले.
ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते:
* सहायक वनसंरक्षक रत्नागिरी-चिपळूण: श्रीमती प्रियंका लगड
* परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी: श्री. प्रकाश सुतार
* परिक्षेत्र वन अधिकारी फिरते पथक रत्नागिरी-चिपळूण: श्री. जितेंद्र गुजले
* वनपाल संगमेश्वर-देवरुख: श्री. सागर गोसावी
* वनपाल लांजा: सारिक फकीर
* वनरक्षक फुणगूस: श्री. आकाश कडूकर
* वनरक्षक साखरपा: श्री. सहयोग कराडे
* वनरक्षक दाभोळे: श्रीमती सुप्रिया काळे
* वनरक्षक आरवली: श्री. सुरज तेली
* वनरक्षक लांजा: श्रीमती नमिता कांबळे
* वनरक्षक कोरले: श्रीमती श्रावणी पवार
* वनरक्षक राजापूर फिरते पथक: श्री. विशाल पाटील
* वनरक्षक फिरते पथक: श्री. दत्तात्रय सुर्वे
* वनरक्षक वन तपासणी नाका साखरपा: श्री. रणजीत पाटील
* पोलीस पाटील साडवली आणि स्थानिक ग्रामस्थ
या घटनेच्या निमित्ताने वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर संपर्क साधावा.