
रत्नागिरी : मडगाव-मुंबई या वंदे भारत या नव्याने सुरु झालेल्या एक्सप्रेसचे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर
रत्नागिरीकरांकडून स्वागत करण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतवेळी आयोजित समारंभात कुवारबाव येथील श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल इयत्ता आठवी आणि नववीच्या वर्गातील 65 विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले.
या सर्व विद्यार्थ्याना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कात्रे, नंदन ढापरे, सुनील जाधव, सौ सेजल खारवडकर, सौ रेखा पटवर्धन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. गीत सादर करण्यासाठी माजी विद्यार्थी सतीश राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, माजी आमदार बाळ माने, भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन, दि. न्यू. सोसायटीचे अध्यक्ष ॲड.बाबासाहेब परुळेकर, ॲड. विलास पाटणे, शेखर लेले, सचिन वहाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, कोकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक श्री.कांबळे आदी उपस्थित होते. समूहगीत सादर करण्यासाठी कोकण रेल्वेचे अधिकारी आनंद केतकर यांनी प्रोत्साहित केले.











