मिठगवाणेचे माजी सरपंच बलवंत सूतार शिवप्रतिष्ठान पूणेच्या पुरस्काराने सन्मानित

पूणे येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने बलवंत सूतार यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने गौरवताना मान्यवर सोबत माडबनचे माजी उपसरपंच पूनम मयेकर.

राजापूरः प्रतिनिधी तालुक्यातील मिठगवाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जानशी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बलवंत गणपत सूतार यांना पूणे येथील शिव प्रतिष्ठानच्या वतीने मानाचा राज्यस्तरीय महाराष्ट्र आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, कला क्षेत्रातील प्रभावी व्यक्तीमत्त्वांना त्यांच्या योगदानाबद्दल प्रतीवर्षी शिवप्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कारित केले जाते. यंदाच्या २०२५ मधील शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी श्री. सूतार यांची निवड करण्यात आली होती.

समाजाच्या प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी श्री. सूतार यांनी केलेल्या अथक कार्याची आणि त्यातून निर्माण झालेल्या सकारात्मक बदलांची दखल घेत हा यथोचित सन्मान असल्याचे यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मदन पाटील यांनी बोलताना सांगीतले. यावेळी सचिव सौ. मीरा रेनगडे यांनीही आपल्या भाषणात श्री. सुतार यांचा गौरव केला. या पुरस्काराबद्दल बलवंत सुतार यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे. ते राजापूर तालुका वकील बार संघटनेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.