देवगड मध्ये पावसाची कोसळधार, घरांची पडझड सुरूच

देवगड तालुक्यात वादळी वाèयासह मुसळधार

तांबळडेग व विजयदूर्ग येथे घरांचे नुकसान
देवगड :
देवगड तालुक्यात सलग चौथ्या दीवशीही वादळी वाèयासह पडणाऱ्या पावसाने वीजयदूर्ग, तांबळडेग येथे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.तालुक्यात ७६ मीमी पावसाची नोंद झाली.
वादळी वाऱ्यासह संततधार पाऊस सुरूच असून वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे वीद्युतपुरवठा खंडीत होत होता.

वादळी वारा व पाऊसामुळे वीजयदूर्ग येथील शुभांगी प्रकाश पवार यांच्या घराची पडझड होवून सुमारे १६,७५० रूपये एवढे नुकसान झाले.तर तांबळडेग येथील वीलासीनी वीश्वनाथ आडकर यांच्या घराचे सुमारे ४२ हजाराचे नुकसान झाले.देवगडमध्ये गुरूवारी सकाळी ७६ म{मी पावसाची नोंद झाली.