लांजा (प्रतिनिधी) येथील युवा उद्योजक, हॉटेल व्यावसायिक पंढरीनाथ मायशेट्ये यांना फ्रेंड्स ग्रुप लांजा तर्फे नुकताच उद्यमश्री फ्रेंड्स रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गेल्या २३ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात असलेल्या पंढरीनाथ मायशेट्ये यांनी मेहनत, चिकाटी आणि कल्पकतेच्या बळावर हॉटेल व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे. आपल्या हॉटेल व्यवसायातसातत्याने नवनवीन कल्पना आणि ग्राहकाभिमुख सेवा देत पंढरीनाथ मायशेट्ये यांनी हॅप्पी पंजाबी ढाबा या नावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा गौरव म्हणून फ्रेंड्स ग्रुप तर्फे उद्यमश्री फ्रेंड्स रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिवाळी सणाचे औचित्य साधून मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल, लांजा यांच्या पटांगणावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पंढरीनाथ मायशेट्ये यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.दरम्यान, या कार्यक्रमावेळी फ्रेंड्स ग्रुपचे पदाधिकारी, व्यावसायिक, नागरिक आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.












