देवगड : प्रतिनिधी
देवगडे। अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर तज्ञ
संचालक म्हणून नगरसेविका एडवोकेट प्रणाली माने यांची निवड करण्यात
आली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये
ठराव क्रमांक २५ ने तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात
आली आहे.सौ.प्रणाली माने या विद्यमान नगरसेविका असून त्यांनी
यापुर्वी नगराध्यक्षा, उपसभापती आदी महत्वाची पदे भुषविली आहेत.तज्ञ
संचालक म्हणून त्यांचा झालेल्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन
होत आहे.