सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत.या जागांवर सेवानिवृत्त शिक्षक घेण्याचे शासना,ने निश्चित केले असून,२० हाजार रुपये येवढ्या मानधनावर हे शिक्षक भरले जाणार आहेत.याचे अर्ज उपलब्ध झाले आहेत.जिल्ह्यातील सेवा निवृत्त शिक्षकांनी यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
15 जून रोजी सर्व शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे आंतर जिल्हा बदलीमुळे मोठ्या प्रमाणात रिक्त झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाच्या नियोजित भरतीला उच्च न्यायालयातील दाखल रिट याचिकांमुळे विलंब होत आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचा शासनाने निश्चित केलाअसून, शासनाने पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळा मधील रिक्त शिक्षक पदे भरण्याचे निश्चित केले आहे.
यासाठी प्रति महिना वीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकाची कमाल वयोमर्यादा 70 वर्ष राहणार आहे. आदी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. याबाबत अर्ज गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत भरून ते 14 जुलै पर्यंत सादर करावयाचे आहेत ही भरती प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. अशी माहिती पालक मंत्र्यांनी दिली.या शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.