सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या आनंद शिशुवाटिकेचा शुभेच्छा समारंभ संपन्न

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या आनंद शिशुवाटिकेचा, बालवाडीतून इयत्ता पहिलीमध्ये जाणाऱ्या मुलांचा शुभेच्छा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी निपुण गटातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिशुवाटिकेला दोन वायरलेस कॉलर माईक भेट म्हणून दिले. तसेच, मुलांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगतेही व्यक्त केली.

संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई यांनी यावेळी बोलताना मुलांशी संवाद साधला. “मुलं आणि पालकांमध्ये मित्रत्वाचे नाते असणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. संस्था संचालक अण्णा म्हापसेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या सोहळ्याला संस्थेचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका सौ. राजश्री टिपणीस, प्राजक्ता वेंगुर्लेकर, सुचिता वारंग, विभा पई, अनुष्का धाऊसकर, सौ. पांगम, दिव्यानी शिंदे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.