वेंगुर्ले: प्रतिनिधी
कोकणातील जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या व निसर्ग संवर्धनाची परंपरा जपणाऱ्या अणसूर गावातील पुरातन कालीन नैसर्गिक झऱ्याचे वाहून जाणारे पाणी साठवण्याच्या उद्देशाने लोकसहभागातून ग्रामपंचायत ने वनराई बंधारा बांधण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध उपक्रमात अणसुर ग्रामपंचायत हिरहिरीने भाग घेताना दिसत आहे.
अणसूर गावामध्ये जैव विविधतेने नटलेल्या सुंदर निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी वसलेल जैन मंदिर आहे. आणि या मंदिराच्या समोरच वर्षाच्या १२ महिने वाहणारा नैसर्गिक झरा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू बागायती आहेत तसेच गावात भात शेतीही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या ठिकाणचे क्षेत्र शिंचना खाली आणून शेतकऱ्यांना त्याचा मोठया प्रमाणात फायदा देण्याच्या उद्देशाने अणसूर ग्रामपंचायत च्या वतीने वनराई बंधारा बांधण्याचा बांधण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील या हंगामातील लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा शुभारंभ अणसुर गावातून करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचा मुख्य उद्धेश लोक सहभागातून हे अभियान राबवायचे आहे. आणि त्याची सुरवात ग्रामपंचायतच्या वतीने वनराई बांधारा घालून करण्यात आली. या अभियानात अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे बंधारा बांधण्याचे काम अणसूर ग्रामपंचायत ने केले आहे.
अणसूर गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे या मध्ये आंबा, काजू, भात, तसेच उन्हाळी शेती मध्ये चवळी, उडीद, कुळीद, मिरची, नाचणी मोट्या प्रमाणात केली जाते आणि या बधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तसेच या पाण्यामुळे वन्यप्राणी, गुरे यांना पण त्याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्या साठी अणसूर ग्रामपंचायत ने सहभाग घेतला आहे. आणि हे अभियान राबविण्यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले आहे. सर्वजण एकजुटीने विवीध उपक्रम राबवून हे अभियान यशस्वी करून दाखविण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. तसचे ग्रामपंचायत ची पूर्ण टीम यात सक्रिय आहेत. हा बांधारा घालत असताना वेंगुर्ला पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, वामन गावडे, सुधाकर गावडे, सीमा गावडे, प्रज्ञा गावडे आदी उपस्थित होते.












