वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूक २०२५

सहाव्या दिवशी नगरसेवक पदासाठी १८ उमेदवारी अर्ज दाखल…

नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज नाही..

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शनिवारी सहाव्या दिवशी वेंगुर्ल्यात निवडणूक वातावरण तापू लागले आहे. आज नगरसेवक पदासाठी १८ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान काल काँग्रेस तर्फे एक अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे नगरसेवक पदासाठी एकूण १९ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी दहा जण इच्छुक उमेदवार आहेत मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

वेंगुर्ले येथे आज निवडणूक कक्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या ११ उमेदवारांनी विविध प्रभागातून अर्ज दाखल केले. त्यामध्ये पूजा सुशील घाडी – प्रभाग २ अ, राधिका राजाराम लोणे – प्रभाग ७ अ, श्रुती श्रीकांत गिरप – प्रभाग ६ अ, संदेश प्रभाकर निकम – प्रभाग ८ ब, अक्षय गुरुनाथ जाधव – प्रभाग ९ अ, अजित सुभाष राऊळ – प्रभाग ४ ब, संगीता संतोष नाईक – प्रभाग ९ ब, सुमन संदेश निकम – प्रभाग ८ अ, कोमल कमलाकर सरमळकर – प्रभाग ४ अ, रॉक इओरीन परेरा – प्रभाग ७ ब, अंकिता अविनाश केरकर – प्रभाग १० ब यांचा समावेश आहे.

काँग्रेस पक्षाने देखील आज उमेदवारी प्रक्रिया गतीमान केली. सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले यामध्ये सत्वशीला विठ्ठल घाटकर – प्रभाग ३ ब, चेतन चंद्रमोहन कुबल – प्रभाग ५ ब, महेश सूर्यकांत डिचोलकर – प्रभाग ६ ब, देविदास रमाकांत आरोस्कर – प्रभाग ३ अ, कृतिका कमलाकांत कुबल – प्रभाग ५ अ आणि सतेज पुंडलिक मयेकर – प्रभाग ८ ब यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नरेंद्र गुरुनाथ नाईक यांनी प्रभाग ४ ब मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विशेष म्हणजे, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही प्रमुख पक्षांकडून आजपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार उद्या किंवा परवा आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.