शिक्षणमंत्री केसरकर यांचा वाढदिवस शिवसेनेतर्फे उत्साहात साजरा

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस त्यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सावंतवाडी आठवडा बाजारातील फिरत्या विक्रेत्यांना टेंडचं वाटप करण्यात आले.
या वेळी , जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगराध्यक्ष अनारोजिन लोबो, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद नाडकर्णी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, अब्जु सावंत, परशुराम चलवाडी, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, ॲड. अशोक पेडणेकर, श्याम हळदणकर, शरद पेडणेकर, सुधीर पराडकर, आदी उपस्थित होते.