रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांमध्ये सध्या ‘बोगस प्रमाणपत्र’ प्रकरणाने खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांग आरक्षणातून नोकरी मिळवली आहे, त्यांच्या प्रमाणपत्रांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील तब्बल २६६ कर्मचाऱ्यांची यादी तपासणीसाठी तयार करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील विशेष वैद्यकीय मंडळासमोर (Medical Board) हजर राहवे लागणार आहे. जर कोणाचे प्रमाणपत्र बनावट आढळले किंवा अपंगत्वाची टक्केवारी नियमापेक्षा कमी भरली, तर त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई होऊ शकते.












