भाजपा महाराष्ट्र प्रदेश केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ठ कार्यकारणी जाहीर
वैभववाडी | प्रतिनिधी : भाजपा महाराष्ट्र प्रदेश केमिस्ट फार्मासिस्ट प्रकोष्ठची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे. या कार्यकारणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विभागीय सहसंयोजक पदी संजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. निवडीचे नियुक्तीपत्र श्री. सावंत यांना प्राप्त झाले आहे. निवडीनंतर कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी सावंत यांचे अभिनंदन केले.
श्री संजय सावंत हे वाभवे – वैभववाडी नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. भाजपचा प्रामाणिक व शिस्तप्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. संघटना वाढीमध्ये तसेच पक्षाचे विविध उपक्रम राबविण्यात त्यांचे योगदान आहे.
त्यांच्या निवडून नंतर जिल्ह्यातील डॉक्टर संघटना, केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटना व वैभववाडी वाशियांकडून अभिनंदन केले जात आहे.
फोटो – संजय सावंत












