माजी विद्यार्थी संस्थेचा स्त्यूत्य उपक्रम
वैभववाडी | प्रतिनिधी ; आचिर्णे माजी विद्यार्थी संस्थेतर्फे यशवंतराव चव्हाण विद्यालयतील विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे आजीव सदस्य बाळकृष्ण शांताराम रावराणे, सूर्यकांत झिलू रावराणे, उदयकुमार पंडित रावराणे, आदेश पंडित रावराणे, रामचंद्र सोनू कदम, शाळेचे मुख्याध्यापक कारेकर, मंदार सहदेव सुतार इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलतांना उदय रावराणे यांनी संस्थेची भूमिका विशद केली.”होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून देणे” हा संस्थेचा उद्देश आहे. त्यासाठी जो निधी आवश्यक आहे, तो दानशूर व्यक्तींकडून उभारला जाईल. त्याच्या व्याजातून मदत करण्यात येईल. ती रोख स्वरूपात द्यावी की वस्तूच्या स्वरूपात द्यावी यावर वेळोवेळी विचार करण्यात येईल. परंतु या वर्षी इयत्ता पाचवीत शिकत असलेल्या मुलांना शालेय दप्तर देत आहोत. पुढिल काळात अजूनही मदत करण्यात येईल. शेवटी दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करावी असे आवाहन केले. याप्रसंगी पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












