माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे भारतीय जनता पार्टीच्या संगमेश्वर तालुका माहिला मोर्चा तर्फे पाक कला स्पर्धा व रानभाज्या महोत्सव झाला.हा कार्यक्रम आंबव पोंक्षे येथील वरची घडशी वाडी च्या सभागृहात झाला.यावेळी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत आरोही रुपेश घडशी (प्रथम),आकांशा अनंत घडशी (द्वितीय),निशा निलेश मिस्त्री (तृतीय) क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेला माखजन जिल्हा परिषद गटातील अनेक महिलांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे शेकडो महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला भाजपा चिपळूण विधान सभा क्षेत्र प्रमुख तथा संगमेश्वर तालुक्याचे प्रभारी अध्यक्ष श्री प्रमोदजी अधटराव यांची मुख्य उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास महिला तालुकाध्यक्ष सौ कोमल रहाटे, तालुका सरचिटणीस सौ सुमन झगडे, देवरुख शहर अध्यक्ष सौ स्नेहा फाटक, देवरुख शहर सरचिटणीस सौ श्रद्धा इंदूलकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी महिला तालुका उपाध्यक्ष सौ शीतल दिंडे आणि महिला मोर्चा तालुका महामंत्री सौ नुपुरा मुळे यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ नुपुरा मुळे यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवर सौ कोमल रहाटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला श्री प्रमोद अधटराव यांनी संबोधित केले. जुन्या संस्कृती,परंपरा जपल्या पाहिजे असे मत त्यांनी मांडले,या कार्यक्रमाच्या आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.स्पर्धेवेळी सौ स्नेहा फाटक आणि सौ श्रद्धा इंदुलकर यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. पाककलेच्या आयुर्वेदिक व नैसर्गिक गुणवत्ता तसेच चवीच्या आधारे स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली. स्पर्धेत सहभागी महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.आभार सौ शीतल दिंडे यांनी मानले.











