उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर परिसरातील शाळांमध्ये वह्या वाटप

 

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण शहराच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांचा सहकार्याने अ. शि. दे. टोपिवाला हायस्कुल, रोझरी इग्लिश स्कुल, कृ. शि. देसाई हायस्कुल, जय गणेश हायस्कुल, कुडाळकर हायस्कुल, रेकोबा हायस्कूल येथे गरजु विद्यार्थाना वह्या वाटप करण्यात आल्या.

यावेळी शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर गणेश कुशे, बाबा परब, आप्पा लुडबे, सौ. पूजा करलकर, प्रमोद करलकर, आबा हडकर, ललित चव्हाण, महेश सारंग, नंदू देसाई, बबलु राऊत, निलेश लुडबे, निशांद बादेकर, निशय पालेकर, मंदार लुडबे, ओकार लुडबे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर ठेवण्यासाठी तसेच जनतेचा सेवेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घायुष्य लाभो चांगले आरोग्य लाभावे. उतंग यश मिळून देशाचा राजकारणात अग्रेसर रहाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्याचे मालवण शहर भाजप प्रभारी विजय केनवडेकर यांनी माहिती देताना सांगितले.